शिरोडा वेळागर येथे समुद्राचे खारे पाणी माड बागायतीत शिरून ग्रामस्थांचे नुकसान. वेंगुर्ला खार भूमी विभागाला जाब विचारणार : आबा चिपकर.

शिरोडा वेळागर येथे समुद्राचे खारे पाणी माड बागायतीत शिरून ग्रामस्थांचे नुकसान.  वेंगुर्ला खार भूमी विभागाला जाब विचारणार : आबा चिपकर.

वेंगुर्ला.

      शिरोडा येथील वेळागर मध्ये समुद्राचे पाणी माड बागायती शिरून झाडांचे नुकसान होत आहे या संदर्भात अधिकाऱ्यांना पत्र देऊन देखील काही कार्यवाही न झाल्यामुळे याबाबत माजी आमदार तथा राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनखाली वेंगुर्ला खार भूमी विभागाला घेरावं घालून जाब विचारणार असल्याचे मनसे वेंगुर्ला माजी तालुका सचिव तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हा सहसचिव आबा चिपकर यांनी सांगितले आहे.
    शिरोडा वेळागरवाडीत जाणाऱ्या मार्गांवर दोन छोटी पुले आहेत. त्यावर दोन पाईपलाईन टाकण्यात आले असून दोन्ही पुलांच्या एक एक पाईपचे झाकण मोडले आहे. सध्या दोन्ही पाईप लाईन उघडी असून त्यातून समुद्राचे पाणी पाईप मधून शिरून माड बागायतीत घुसत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर बागायतीचे नुकसान होतं आहे. याबाबत शिरोडा ग्रामपंचायत, खारभूमी उपविभाग वेंगुर्ला यांच्याकडे  पत्रव्यवहार करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या स्थितीत समुद्राला मोठे उधाण येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घुसून नुकसान होतं आहे. असे चिपकर पुढे म्हणाले.