खासदार नारायण राणे यांच्या विजयात दिपक केसरकर यांचा मोलाचा वाटा : सचिन वालावलकर. लोकसभेत यश मिळाले आता विधानसभेसाठी कामाला लागण्याच्या शिवसैनिकांना सूचना.

खासदार नारायण राणे यांच्या विजयात दिपक केसरकर यांचा मोलाचा वाटा : सचिन वालावलकर.   लोकसभेत यश मिळाले आता विधानसभेसाठी कामाला लागण्याच्या शिवसैनिकांना सूचना.

वेंगुर्ला.

  खासदार नारायण राणे यांचा झालेला विजय लक्षात घेता त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे व मंत्री दीपक केसरकर यांचा मोलाचा वाटा आहे असा दावा शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केला.वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुका शिवसेनेच्या आढावा बैठकीत ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आता येणाऱ्या विधानसभेत त्याच ताकदीने यश मिळवायचे आहे.त्यामुळे कामाला लागा, गावागावात गाठीभेटी घेऊन जनतेचे प्रश्न जाणून घ्या,असे आवाहन  येथे आयोजित शिवसेनेच्या बैठकीत वालावलकर यांनी केली.
  यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर,जिल्हा संघटक सुनील डुबळे,जेष्ठ पदाधिकारी महेश सामंत,उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सचिन देसाई, तालुका संघटक बाळा दळवी, कोचरा सरपंच योगेश तेली, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश गावडे, शहरप्रमुख संतोष परब आदी उपस्थित होते.