गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार; २८ जणांचा मृत्यू.
अहमदाबाद.
गेल्या चार दिवसांपासून गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील २४ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून अनेक भागात पाणी शिरले आहे. पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे अनेक भागात पाणी शिरले असून आत्तापर्यंत विविध दुर्घटनांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १७८०० जणांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारसह बचाव पथके अलर्ट झाली आहेत.
गुजरातमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यामध्ये आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, घर कोसळून 13 जणांचा तर झाडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. राज्यामध्ये सलग चौथ्या दिवशी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून पूरग्रस्त भागातून 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेना, भारतीय हवाई दल आणि भारतीय तट रक्षक दलांच्या मदतीनं गुजरातमध्ये बचाव कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून गुजरातमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्यानं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आज गुरुवारी 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर 22 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदाबाद, जामनगर, देवभूमी द्वारका, पंचमहाल, अरवली, डांग, सुरेंद्रनगर, दाहोद, खेडा, भरूच, आनंद, महिसागर, वडोदरा, गांधीनगर आणि मोरबी येथील मृतांची नावे आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथील आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय बैठक घेऊन जिल्हा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि विकास अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या सद्यस्थितीबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली.