घोणसरी ग्रामपंचायत येथे आयोजित वयोश्री कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद.
वैभववाडी.
राज्य सरकार च्या वयोश्री योजनेच्या माहिती आणि अर्ज जमा करून घेण्यासाठी घोणसरी ग्रा.पं.च्या सभागृहात आयोजित विशेष कॅम्पला जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच दिप्ती कारेकर, ग्रा. पं सदस्य तसेच भाजपा पदाधिकारी वं कार्यकर्ते यांनी आयोजित केलेल्या या विशेष कॅम्प मध्ये गावातील दीडशे पेक्षा जास्त जेष्ठ नागरिक महिला पुरुषांचे वयोश्री योजनेचे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे भरून घेण्यात आले.
यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच दिप्ती कारेकर. ग्रा.पं.सदस्य प्रसाद राणे, सतीश जाधव,प्राची राणे, अंकिता परब, सुप्रिया आचरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक राणे सोसायटी संचालक छोटू राणे, बूथ अध्यक्ष बाबू राणे,लवू सावंत मिलिंद मराठे, दत्ताराम गुरव, अनंत गुरव, विलास मराठे, दीपक मराठे, विठ्ठल बागवे, एकनाथ परब, दिवाकर कारेकर,विजय एकावडे,घोणसरी ग्रामसेवक सिद्धेश गोसावी,घोणसरी ग्राम.पं कर्मचारी जेरोन बारेत, व्हॅलेरिअन पिंटो, राजू चव्हाण इ.तसेच भाजपा पदाधिकारी वं कार्यकर्ते उपस्थित होते.