बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सांगली येथील दोघे ताब्यात.

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सांगली येथील दोघे ताब्यात.

 

सावंतवाडी 
         बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सांगली येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख ८३ हजाराच्या दारूसह २ लाख किमतीची गाडी असा एकूण ३ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिलीप विकास मोरे (वय ३२, रा. साखराळे) व समीर अमीर खानजादे (वय २४, रा. इस्लामपूर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई आज सकाळी पत्रादेवी रोड आरोसबाग तिठयाजवळ राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून करण्यात आली.
                राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज सकाळी जुना बांदा- पत्रादेवी रोडवर आरोसबाग तिठा येथे वाहनाची तपासणी करत असताना कारमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी दिलीप मोरे व समीर खानजादे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, धनंजय साळुंखे, विवेक कदम, विजय धुमाळ, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.