मळई जय बजरंग क्रिकेट क्लबच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

देवगड.
मळई येथील जय बजरंग क्रिकेट क्लब च्या वतीने दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. जय बजरंग क्रिकेट क्लबच्या वतीने दरवर्षी दहावी बारावी विद्यार्थ्यांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सम्मान करण्यात येतो. यावर्षीही शनिवारी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मळई येथील हनुमान मंदिर येथे बालमंडल संगीत या मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी १० मध्ये तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त सलोनी संजय मेस्त्री, आर्यन सुहास कणेरकर, महेश पांचाळ प्रसाद संदीप कणेरकर तसेच १२ वी मध्ये देवगड कॉलेजमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त भूमिका प्रशांत तारी,आकांक्षा मणचेकर,चैत्राली मणचेकर, भक्ती कणेरकर, खुशी तारी, ओमकार कणेरकर,अनुष्का कणेरकर,सानिका उपरकर, तुषार मेस्त्री, रौजिन शेख, नीती कणेरकर, कुणाल कणेरकर,रिया कणेरकर,या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व रोप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय कोळंबकर, उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर, राजाराम कोंयडे, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर,सौ स्वाती मेस्त्री, सौ मृणालिनी भाबल, अंकुश कोयंडे ,जनार्दन कोयंडे, मुरारी भाबल, बाळकृष्ण राजम, पंढरीनाथ मणचेकर जैनुद्दीन जमादार, उमेश भाबल, दीपक सारंग, राजू तारी, नंदकुमार वाडेकर, रुपेश मणचेकर,
दीपराज मेस्त्री, देवेंद्र मेस्त्री संदीप कणेरकर, श्रीकांत मेस्त्री आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या मंडळाचे अध्यक्ष संजय कोळंबकर यांनी अशाच प्रकारे चांगला अभ्यास करून यशस्वी व्हा व आपल्या गावचे, देशाचे नाव उज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या.