गणेशोत्सवापूर्वी सर्व विभागांनी विकासकामे पूर्ण करावीत : सभापती शंकर घारे 

गणेशोत्सवापूर्वी सर्व विभागांनी विकासकामे पूर्ण करावीत : सभापती शंकर घारे 

 

परुळे 


          कोकणातील महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्वच शासकीय विभागांनी आपापली प्रलंबित कामे चोखपणे पूर्ण करावीत, तसेच वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी सूचना वेंगुर्ले पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत सभापती शंकर घारे यांनी केल्या. परुळे ग्रामपंचात कार्यालयात झालेल्या या सभेत स्मार्ट मीटर, वीजपुरवठा, रस्ते, आरोग्य, कृषी, बांधकाम तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांबाबत या बाबत सविस्तर चर्चा करून उपाययोजना ठरविण्यात आल्या.पंचायत समितीच्या सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सभेला उपसभापती सचिन देसाई यांच्यासह पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, सुचिता वजराटकर, शीतल राऊळ, प्रियंका घाटवळ,  साक्षी नार्वेकर, संकेत धुरी नितीन मंजरेकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्यासह विविध विभागांचे खाते प्रमुख. अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे येतात. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सभेत करण्यात आल्या.स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवरही सभेत चर्चा झाली. ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. वीज बिल व मीटरसंदर्भातील तक्रारींचे योग्य निराकरण करण्यावरही भर देण्यात आला.आरोग्य विभागाने पावसाळ्यातील आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. आरोग्यविषयक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना व योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.सभेत ग्रामस्थांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी अभिनंदन चे ठराव घेण्यात आले यावेळी आमदार दीपक केसरकर  यांनी लावलेल्या आमसभेसाठी तसेच कुमार विजय दिनेश तुळसकर सुप्रिया कोरगावकर तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले. यावेळी सभेआधी ग्रामपंचायत परुळे बाजार तर्फे पंचायत समिती सभापती उपसभापती व सदस्य मा.गटविकास अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच प्राजक्ता पाटकर, सदस्य प्रदीप प्रभू, प्रसाद पाटकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले