वेंगुर्ला येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. वेताळ प्रतिष्ठान चे सलग २६ वे रक्तदान शिबीर: ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
वेंगुर्ला.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी. विभाग आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आयोजित वेताळ प्रतिष्ठान च्या सलग २६ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे रक्तपेढी सिंधुदुर्ग च्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले, वैधकीय अधिकारी डॉ.निखिल शिंदे, अधिपरीचारिका प्रांजली परब, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सिंधु रक्तमित्र वेंगुर्ला शाखा अध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, यशवंत गावडे, रक्त संघटक महेश राऊळ, डॉ. पी.आर.गावडे, डॉ.के.आर. कांबळे, प्रा.जे.वाय.नाईक, रवी शिरसाट, शैलेश जामदार, राजेश पेडणेकर ,सचिन कोंडये आदी मान्यवर उपस्थित होते.
आज सिंधुदुर्ग मद्ये बहुआयामी कार्यक्रम करणारी वेताळ प्रतिष्ठान ही अग्रणी संस्था असून त्यांनी जे लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, आजपर्यंत त्यांनी २५ रक्तदान शिबिरे यशस्वी पार पाडली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो तसेच आज या सर्व संस्था रक्तदान कार्यात मोलाचे योगदान देत असू नवोदित रक्तदात्याना सामाजिक सेवेत सामावून घेत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे असे मनोगत उद्घाटक बाळू देसाई यांनी व्यक्त केले.
डॉ.शिंदे यांनी रक्तदानाचे फायदे विषद करीत रक्तदान करा असे युवकांना आवाहन केले. रक्तदान चळवळ गावागावात रुजली पाहिजे आणि प्रत्येक घराघरात रक्तदाता तयार झाले पाहिजेत यासाठी सर्वांनी मिळून काम करूया असे प्रतिपादन प्रकाश तेंडोलकर यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ एम.बी.चौगले यांनी वेताळ प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या विविध उपक्रमांचा आढावा घेत उपक्रमांस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ६३ दात्यांनी सहभाग नोंदविला तर प्रत्यक्ष ४५ जणांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि रोप देऊन सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानच्या सागर सावंत, माधव तुळसकर, सुनील आळवे,सद्गुरू सावंत, मंगेश सावंत,नाना राऊळ, प्रदीप परुळकर,प्रसाद भणगे,विधी नाईक,जान्हवी सावंत, हेमलता राऊळ,सचिन गावडे,सुहास सावंत,चेतन परब यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार सानिया वराडकर यांनी मानले.