मल्टीस्पेशालिटी होण्यासाठी राजघराणे प्रयत्नशिल - श्रध्दाराजे भोसले
सावंतवाडी
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे रहावे यासाठी राजघराणे म्हणून आम्ही प्रयत्नशिल आहोत. त्यासाठी खुद्द युवराज लखमराजे भोसले अनेक वेळा मुंबईत गेले. ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे राजघराण्यावर टिका करणे योग्य नाही, अशी भूमिका सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान सावंतवाडीच्या विकासासाठी राजघराण्याने यापुर्वी सुध्दा जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे कोण नाहक टिका करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असे ही त्यांनी सांगितले. या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत मायकल डिसोझा यांनी राजघराण्यामुळे सावंतवाडीचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडल्याची टिका केली होती. याला भोसले यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहीनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले आणि सुनिता पेडणेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
konkansamwad 
