सावंतवाडी काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी पुण्यतिथी आणि सरदार पटेल जयंती साजरी......कोल्हापूर गोकुळ दूध संघावर बहुमत मिळविल्याने सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर....९० वर्षीय दिलीप नार्वेकर यांच्या कार्याचा गौरव

सावंतवाडी काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी पुण्यतिथी आणि सरदार पटेल जयंती साजरी......कोल्हापूर गोकुळ दूध संघावर बहुमत मिळविल्याने सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर....९० वर्षीय दिलीप नार्वेकर यांच्या कार्याचा गौरव

सावंतवाडी


      सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीतर्फे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारताचे पहिले गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली.याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते अँड. दिलीप नार्वेकर, तालुका अध्यक्ष राजू मसुरकर, अभय मालवणकर, सुनील पेडणेकर, बाब्या तथा रविंद्र म्हापसेकर आदींनी विचार मांडले. काँग्रेसच्या जडणघडणीत आणि भारत देशाच्या विकासात स्व. इंदिरा गांधी यांचे फार मोठे योगदान आहे. स्वातंत्र्य लढ्यात स्व. सरदार पटेल यांचे भरीव योगदान आहे, असे ते म्हणाले.काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक त्याग केले. अन्याय-अत्याचाराला तोंड देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र आज काँग्रेसला महागाई, बेरोजगारी, महागड्या आरोग्य सुविधा, महागडे शिक्षण, पेपरफुटी आणि मतदानचोरीसारख्या चुकीच्या धोरणांविरोधात पुन्हा चळवळ उभी करावी लागेल, असे मत यावेळी मांडण्यात आले. पैसे वाटून मिळविलेली सत्ता भ्रष्टाचारासाठी एकमेकांच्या अंगावर तुटून पडत आहे. त्यामुळे सत्ता, सत्य आणि संघर्ष जनतेला अनुभवायला मिळत आहे, असेही नेत्यांनी सांगितले.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रथम आमदार निवडून दिल्यानेच हा मतदारसंघ विकासकामांच्या यादीत आघाडीवर आहे. स्व. शिवरामराजे भोसले, स्व. प्रतापराव भोसले आणि माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी विधानसभेत काँग्रेसचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे, याची आठवणही यावेळी करून देण्यात आली.कार्यक्रमात कोल्हापूर येथील माजी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळ दूध संघावर काँग्रेसच्या माध्यमातून निर्विवाद बहुमत मिळविल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेसच्या सत्तेचा महापूर येणार असून नागपूरमध्येही काँग्रेसचे रोपटे लावले जात आहे, असे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी सांगितले.यावेळी 90 वर्षीय ज्येष्ठ काँग्रेस नेते अँड. दिलीप नार्वेकर हे आजही काँग्रेससाठी कार्यरत आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी यूथ क्लब स्थापन केल्यानंतर भंगी संपावर गेल्यावर 42 दिवस स्वतः भंगीचे काम केल्याचे सांगत, आजच्या युवकांमध्ये सामाजिक जाणीव रुजविण्याचे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाला साक्षी वंजारी, सुमेधा सावंत, संजय लाड, अरुण भिसे, अँड. राघवेंद्र नार्वेकर, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, विजय ओटवणेकर, आनंद आयरे, संतोष जोईल, प्रदीप चौगुले, बाळा नमशी, प्रसाद ढवळे, संतोष तानावडे, विष्णू पेडणेकर, पीटर फर्नांडिस, सुभाष नाईक यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.