माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी होणार साजरा : अजय गोंदावळे.

सावंतवाडी.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस १९ तारखेला मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.यावेळी माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली.या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी भाजप व सह्याद्री फाऊंडेशन यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन गोंदावळे यांनी केले आहे. संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
यावेळी परिषदेत मांजरेकर, विनोद सावंत,हेमंत बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.