मालवण येथे सागरी सुरक्षा व नौदल प्रवेशाबाबत मार्गदर्शन.
मालवण.
नौदलाच्या महा कनेक्ट कार ड्राईव्ह या उपक्रमाअंतर्गत जिल्हातील सर्व सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव यांना सागरी सुरक्षेचे महत्व तसेच भारतीय नौदलामध्ये प्रवेश करण्याबाबतचे मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस घ्यावयाची काळजी, मासेमारी करताना घ्यावयाची काळजी, कलर कोडींग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी, सागर सुरक्षा, भारतीय नौसेनेमध्ये नोकरीच्या संधी अशा विविध विषयांची माहिती देण्यात आली.
यावेळी नौदलाच्या कमांडर आसिफ मुल्ला, कमांडर अंकेश बुंदेला, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रवींद्र मालवणकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी, पोलीस पाटील, सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार समुदाय, स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.