वैद्यकीय महाविद्यालयाबाबद शिंदे-फडणवीस सरकारचा भोंगळ कारभार रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर ढोल वाजवून महविकास आघाडीकडून निषेध

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज इमारतीचे काम रखडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणा देत जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर महाविकास आघाडीच्यावतीने ढोल वाजून आरोग्य यंत्रणेचा निषेध करण्यात आला.
"आला पेशंट की पाठवा गोव्याला" अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची झालेली आहे. कोणताही पेशंट आला की गोव्याला पाठविण्याच्या पलीकडे कोणतेही काम शासकीय मेडिकल कॉलेज करत नाही.सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे-फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरु आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर गेल्या तीन वर्षात शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक भरती केलेली नाही, नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत, वसतीगृहाची व्यवस्था केलेली नाही, अपुरे कर्मचारी वर्ग, अपुरा औषधपुरवठा, सिटीस्कॅन मशीन बंद, शस्त्रक्रिया होत नाहीत त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असून याविरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने आज सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर ओरोस येथे "ढोल वाजवुन यंत्रणेला जागे करीत निषेध केला
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, बाळ कनयाळकर, अभय शिरसाट, भास्कर परब, सावली पाटकर, अनंत पिळणकर, राजन नाईक आदी उपस्थित होते.