भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला अध्यक्षपदी डॉ. आनंद बांदेकर यांची निवड

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला  अध्यक्षपदी डॉ. आनंद बांदेकर यांची निवड

 

वेंगुर्ला

 

       भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या सभेत तालुका सरचिटणीस डॉ. आनंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या सभेत अध्यक्षपदी प्रा. ऍड. डॉ. आनंद बांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
      या बैठकीत पुढील तीन वर्षांच्या (२०२५-२६ ते २०२७-२८) कालावधीसाठी नवी कार्यकारिणी निवडण्यात आली.
निवडलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये

अध्यक्ष: प्रा. ऍड. डॉ. आनंद बांदेकर

उपाध्यक्ष: ऍड. श्याम गोडकर, गजानन गोलतकर

सरचिटणीस: डॉ. जी. पी. धुरी

सहचिटणीस: माजी नगरसेविका श्रेया मयेकर

खजिनदार: सुरेश बोवलेकर

     कार्यकारिणी सदस्य म्हणून रमण शंकरराव वायंगणकर, विकास वैद्य, दीपक कोचरेकर, भरत आवळे, रमेश नार्वेकर, सदानंद केरकर, श्रेया मांजरेकर, जयराम वायंगणकर आणि राजेंद्र कांबळी यांची निवड झाली.स्वीकृत सदस्य: प्रा. डॉ. सचिन परुळकर, आत्माराम सोकटे सल्लागार: गुरुनाथ कांबळी, भाऊ  आंदुर्लेकर
         यावेळी मावळते अध्यक्ष ऍड. श्याम गोडकर यांनी गेल्या तीन वर्षांतील मंडळाच्या उपक्रमांचा आढावा घेत समाधान व्यक्त केले आणि सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी आर. के. पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आत्माराम सोकटे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मंडळातर्फे त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
        नूतन अध्यक्ष डॉ. आनंद बांदेकर यांनी समाजातील सर्व सदस्यांचे आभार मानून, “भंडारी समाज संघटित करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले.
      कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. जी. पी. धुरी यांनी आभार प्रदर्शन केले.