पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

वेंगुर्ला

 

     सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटेश्वर नं. 1 शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रहाटेश्वर नं. 1 व गढी ताम्हाणे तसेच तेलीवाडी गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.सामाजिक कार्यकर्ते श्री. अमित अमृतराव कदम, गढी ताम्हाणे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन-पेन्सिलसह इतर शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.कार्यक्रमाला रहाटेश्वरच्या सरपंच सौ. कल्पना कदम, गढी ताम्हाणेचे पोलीस पाटील, रहाटेश्वर नं. 1 शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय चव्हाण, तेलीवाडीचे मुख्याध्यापक श्री. सुजित सानप, रहाटेश्वर व तेलीवाडीच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि नियमित अभ्यास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते. उपस्थितांनी श्री. अमित कदम यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि उपक्रमाचे कौतुक केले.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.