ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू; गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना दिले निवेदन.

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू; गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना दिले निवेदन.

वेंगुर्ला.

   ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अभय यावलकर समितीच्या शिफारशी स्विकारुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागु करावी. ग्रामपंचायत अधिनियम कलम ६१ रद्द करावे. यासहीत अनेक प्रलंबीत मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य ग्रामपंचायत संघटनेने दि. १८, १९, २० डिसेंबर २०२३
या कालावधीत शासनास कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने वेंगुर्ला तालुका ग्रामपंचायत
कर्मचारी संघटना १८, १९, २० डिसेंबर २०२३ या कालावधीत वेंगुर्ला तालुक्यातील कर्मचारी ग्रामपंचायत
स्तरावरील सर्व कामे बंद ठेवुन तीन दिवस कामबंद आंदोलन करणार आहेत याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी यानी निवेदन दिले आहे अशी माहिती अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना वेंगुर्ला तालुका सिंधुदुर्ग यानी दिली.