सिंधुदुर्ग भंडारी महासंघाच्या सभेत मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाची भंडारी भवनाची मागणी ना. नितेश राणे यांनी शब्द देऊन कार्यवाही सुरू केल्याने आज झालेल्या जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी सभा जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली सिध्दीविनायक मंगल कार्यालय कुडाळ येथे संपन्न झाली. यावेळी कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष अतुल बंगे, माजी जिल्हा अध्यक्ष रमण वायंगणकर, माजी जिल्हा अध्यक्ष मामा माड्ये, जिल्हा भंडारी महासंघाचे कार्याध्यक्ष राजु गवंडे, माजी सचिव विकास वैद्य, मालवण तालुका अध्यक्ष रवी तळाशीलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रसाद आरवंदेकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा भंडारी भवन कुडाळमध्ये होवो. ही मागणी माजी जिल्हा अध्यक्ष अतुल बंगे यांनी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यजवळ केली असता जागा आणि आर्थिक तरतुद केली गेली होती. परंतु २०१८ नंतर कार्यवाही काहीच झाली नाही म्हणून हा प्रश्न आपल्या मैत्रीमध्ये मिटेल अशी खात्री झाल्याने बंगे यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना कुडाळ तालुका भंडारी मंडळ गुणगौरव सोहळा व तालुका मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवुन भवनाची मागणी लावून धरली यातच ना. राणे यांनी आपली कित्येक वर्षाची मैत्री बंगे यांची असल्याचा दाखला देत गणेश चतुर्थीपर्यंत भंडारी भवनाचे भुमीपुजन करण्याचा शब्द भंडारी समाजाला दिला. त्यावेळीपासून अतुल बंगे यांच्या खांद्यावर या भवनाच्या पाठपुराव्याची जबाबदारी देऊन जिल्हा कार्याध्यक्ष राजु गवंडे यांच्यासोबत आज प्रशासनाकडून जलद पाठपुरावा झाला आहे म्हणून जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत मंत्री राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर केला गेला.यापुढे भंडारी समाजाची यशाची वाटचाल अशीच चालु रहावी असे आवाहन जेष्ठ भंडारी नेते मामा माड्ये यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल बंगे यांनी तर सुत्र संचलन राजु गवंडे यांनी केले यावेळी युवा भंडारी समाज जिल्हा अध्यक्ष समील जळवी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दर्शन कुडव, प्रविण आचरेकर, चंद्रकांत खडपकर, चंदन पांगे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष मोहन गवंडे, विठोबा पालयेकर, रामदास तेंडुलकर, संतोष वैज, महेंद्र मांजरेकर, नामदेव साटेलकर, दीपक कोचरेकर, भरत आवळे आदी जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते