इन्सुली घाटातील धोकादायक झाडे तातडीने तोडा....जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांची वनविभागाकडे मागणी

इन्सुली घाटातील धोकादायक झाडे तातडीने तोडा....जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांची वनविभागाकडे मागणी

 

बांदा

 

     इन्सुली घाटातील धोकादायक झाडे तातडीने तोडा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी सावंतवाडी वनक्षेत्रपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घाटातून वाहनांची मोठी वर्दळ असते आणि सध्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांमुळे ही झाडे कोसळून गंभीर अपघात किंवा जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने या मार्गाची त्वरित पाहणी करून घातक झाडे तातडीने तोडावीत, अशी मागणी राऊळ यांनी केली आहे.राऊळ यांनी प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन धोकादायक झाडांची पाहणी करावी आणि आवश्यक ती झाडे त्वरित तोडून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे. इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी मान्सूनपूर्व काळात घाट परिसरात वादळी वारे व पावसाचा प्रभाव वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई तातडीची असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.