महालक्ष्मी वाचनालयात दिवाळी अंकांची मेजवानी
परुळे
परुळे येथील वाचकांसाठी दिवाळीचे खास आनंद द्विगुणित करणारी बातमी. दिवाळीच्या आगमनासोबतच फराळ, आकाशकंदिल आणि मातीचे किल्ले याबरोबरच वाचकांची उत्सुकता असते दिवाळी अंकांची. सध्याच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात वाचन कमी झाल्याचे ओरड असूनही, वाचक अजूनही या दिवाळी अंकांची प्रतीक्षा करतात.
परुळे येथील महालक्ष्मी वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय यांनी वाचकांसाठी विविध दिवाळी अंक उपलब्ध करून दिले आहेत. वाचकांना सवलतीच्या दराने या अंकांचा लाभ घेता येईल. सर्व वाचकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

konkansamwad 
