कुशेवाडा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निलेश परुळेकर

कुशेवाडा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निलेश परुळेकर

 

वेंगुर्ला
 

      कुशेवाडा ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निलेश परुळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. कुशेवडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली यावेळी सरपंच निलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सचिन देसाई, प्रकाश राणे, ग्रामपंचायत अधिकारी आनंद परुळेकर, पोलीस पाटिल प्रियदर्श कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर विचार विनिमय करण्यात आला. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे पुनर्रचना करण्यात आली यावेळी निलेश परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून नूतन अध्यक्ष यांचे यावेळी ग्रामपंचायतच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.