शिवसेना महिला आघाडीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रम

शिवसेना महिला आघाडीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रम

 

सावंतवाडी

 

   माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रम राबविण्यात आले. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सदिच्छा व्यक्त केली. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, कोकणावर प्रेम करणारा नेता नारायण राणे आहे. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री झाले तरी कोकणावरी त्यांची माया कमी झाली नाही असे मत व्यक्त केले. बॅ नाथ पै सभागृहातील कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ महिला किर्तनकार लालिन प्रभाकर तेली यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार दिव्या वायंगणकर, अनुजा कुडतरकर, मितल धुरी, विभावरी परब यांचाही गौरव खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी आयोजित पाककला स्पर्धेमध्ये विणा साटेलकर प्रथम, द्वितीय अनघा सावंत, तृतीय क्रमांक साधना मोरे व करुणा कुमठेकर यांनी पटकावला. याचे परिक्षण विभावरी परब यांनी केलं. तर वेशभूषा स्पर्धेत नंदन कुमठेकर या चिमुकल्याने क्रमांक प्राप्त केला. रात्री दशावतार नाट्य प्रयोग देखील सादर करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडीच्या पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव,शिवसेना नेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, खरेदी विक्री संघापे उपाध्यक्ष राजन रेडकर, प्रेमानंद देसाई, राकेश पवार, नगरसेविका स्नेहा नाईक, उत्कर्षा सासोलकर, सुप्रिता धारणकर, शिवानी पाटकर, भारती परब, पूजा नाईक, राजश्री निर्गुण, अनघा सावंत, साधना मोरे, करुणा कुमठेकर, अनुष्का कलंबिसकर, संजना आंबेरकर, आयरिन डिसा, अर्चना बोंद्रे, संचिता केनवडेकर, शुभांगी तुयेकर, शीतल नाईक, कांचन जाधव, निर्जरा सावंत, सिद्धी निंबाळकर, हर्षा जाधव, रूची परब, शुक्ता पडवेकर, श्वेता साटेलकर, सेजल केनवडेकर आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.