भारताला आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत पाच सुवर्णपदके
उलनबतार
येथे सुरू असलेल्या २०२६ च्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदकतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे. भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत पाच सुवर्णपदके मिळविली.आहेत. मात्र कझाकस्तान सहा सुवर्ण पदकांसह आघाडीवर असून त्यांनी एकूण १६ पदकांची कमाई केली आहे. पुरूषांच्या ५० किलो वजन गटात अंतिम लढतीत भारताच्या विश्वनाथ सुरेशने जपानच्या दायची इवाईचा५-० अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या ६० किलो वजन गटात भारताच्या सचिनला रौप्य पदक मिळाले.महिलांच्या विभागात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी पदक तक्त्यात ऐतिहासिक कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्यपदकांसह एकूण १० पदकांची कमाई केली. महिलांच्या विभागात मीनाक्षीने ४८ किलो गटात, प्रीतीने ५४ किलो गटात, प्रियाने ६० किलो गटात तर अरुंधती चौधरीने ७० किलो गटात सुवर्णपदके मिळविली.
konkansamwad 
