परुळेबाजार ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची भेट देऊन पाहणी.

परुळेबाजार ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची भेट देऊन पाहणी.

वेंगुर्ला.

    परुळेबाजार ग्रामपंचायत ची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षाच्या कालावधीत घेण्यात आलेल्या एकत्रित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी राज्य स्तरीय स्पर्धेकरीता मुल्यमापन करण्यात आले.यावेळी या समितीत अप्पर सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय तथा अध्यक्ष राज्य स्तरीय तपासणी समिती चंद्रकांत मोरे तसेच बाळासाहेब हजारे सदस्य-सचिव तसेच रमेश पात्रे राज्यस्तरीय समिती सदस्य यांचा समावेश होता.
    यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर गटविकासअधिकारी जी.एस.नाईक, गटशिक्षणाकरी संतोष गोसावी, उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, मुख्य सेविका शर्मिष्ठा सामंत, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुदवडकर, माजी सरपंच प्रदिप प्रभु, ग्रामसेवक शरद शिंदे, माजी सरपंच श्वेता चव्हाण, स्वच्छताकक्षाचे श्री. पडते, वेंगुर्ला पंचायत समिती विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, अक्षता नाईक सदस्य, तन्वी दूधवडकर, नमिता परुळेकर, सुनाद राऊळ, सीमा सावंत, यांसह ग्रामस्थ, आया सुधीर पेडणेकर, आपा राठीवडेकर,
सुनील चव्हाण, अंगणवाडी सेविका, आरोग्य 
विभागाचे कर्मचारी, शिक्षक वर्ग, सी.आर.पी तसेच महिला वर्ग उपस्थित होता.
    यावेळी समितीने ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत अभियान कालावधीतीय विविध उपक्रमांची पाहणी केली. यात तालुका कचरा प्रक्रिया युनीटे, मैला, गाळ व्यवस्थापन, गांडूळखत प्रकण्य, स्वच्छतागृह, काथ्या प्रकल्प तसेच ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गौतम नगर, व आदि नारायण मंदिर. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन गौतमनगर येथे भेट देऊन महीला बचत गटाच्या विविध उपक्रमांची माहीती घेतली. एकंदरीत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर राज्यस्तरीय समितीने समाधान व्यक्त केले.पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.