जागतिक महिला दिनाच्या औचित्याने खुल्या ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर - मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली, यांच्या वतीने आयोजन.
वेंगुर्ला.
बदलती जीवनशैली स्वीकारत महिलांनी सर्व क्षेत्रांमध्ये आपले संस्मरणीय योगदान दिलेले आहे. अखिल स्त्री जातीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ०८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून नाविन्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर- मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त 'महिलांसाठी' ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर ऑनलाईन अभिनय स्पर्धा ही शालेय गट (इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शालेय मुली) आणि खुला गट अशा दोन गटात महिलांसाठी होणार असून कोणत्याही सामाजिक ज्वलंत विषयावरती किमान ०३ मिनिटे ते कमाल ०४ मिनिटे चा मोबाईलवर व्हिडिओ तयार करून सदर व्हिडिओ ९४२१२३८०५३ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर दिनांक ५ मार्च २०२४ पूर्वी पाठवायचा आहे. सदर ऑनलाईन स्पर्धेसाठी स्पर्धकांनी रंगभूषा किंवा वेशभूषा करण्याची आवश्यकता नाही.व्हिडिओ एडिट केलेला नसावा. स्पर्धकांनी व्हिडिओ चित्रित करताना स्वतःचे पूर्ण नाव,स्पर्धा गट, गाव, संपर्क क्रमांक आणि त्यानंतर अभिनय विषय त्यांनतर मुख्य अभिनय असा सादरीकरणाचा क्रम ठेवायचा आहे.तसेच रेकॉर्डिंग करताना इतर आवाज येणार नाही याची दक्षता घ्यावी.शालेय विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शिवाय शाळा शिफारस पत्र किंवा ओळखपत्र पाठवणे बंधनकारक आहे.
दोन्ही गटातील स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ७००, ५५०, ४००, २५०, २५० आणि प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात येईल.
तरी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर - मेस्त्री यांनी केले आहे.