गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूकी विरोधात बांदा पोलिसांची कारवाई; एक जण ताब्यात. एकूण ६ लाख ११ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूकी विरोधात बांदा पोलिसांची कारवाई; एक जण ताब्यात.  एकूण ६ लाख ११ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी.

    फळांच्या रिकाम्या क्रेटच्या आडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मिरज येथील एकाला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दारू सह ५० हजाराची गाडी असा एकूण ६ लाख ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकाश बाजीराव मारकड (वय ३३, रा. दत्तनगर-सांगली ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज ९ वाजण्याच्या सुमारास आंबोली चेक पोस्ट येथे करण्यात आली.
     याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आंबोली चेक पोस्ट येथे संशयित वाहनांची तपासणी करत असताना मारकडच्या गाडीची तपासणी केली असता वाहनांमध्ये गोवा बनावटीचे एकूण ४० कागदी पट्ट्याचे बॉक्स असा साठा मिळून आला. याप्रकरणी प्रकाश मारकड याला ताब्यात घेण्यात आले आहे. यात दारूसह ५० हजाराची गाडी असा एकूण ६ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
   ही कारवाई पी.आय. तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे, अभिजीत कांबळे, राजेश नाईक आदींनी केली.