इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल स्पर्धा.....कुडाळमध्ये २५ जानेवारीला मोठा सोहळा

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल स्पर्धा.....कुडाळमध्ये २५ जानेवारीला मोठा सोहळा

 

कुडाळ

 

 

      कुडाळ, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि रेनबो रायडर्स ओरोसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल स्पर्धेचे आयोजन २५ जानेवारीला कुडाळ येथे करण्यात आले आहे. बॅ. नाथ पै मैदान, एमआयडीसी, कुडाळ येथून ही स्पर्धा सुरू होणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप

ही स्पर्धा २५ किमी फन राईड व ६० किमी एलिट रेस अशा दोन प्रमुख विभागात होणार आहे. स्पर्धकांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सर्वसाधारण विजेता २५ हजार तर पुरुष गटात १४ ते ४० वर्षे ओपन तसेच ४० वर्षांवरील मास्टर्स, आणि महिला गटासाठी ओपन अशी एलिट रेसची विभागणी करण्यात आली आहे.

पारितोषिके

प्रत्येक गटात प्रथम १५ हजार व ट्रॉफी, द्वितीय १० हजार व ट्रॉफी, तृतीय क्रमांक ७ हजार व ट्रॉफी देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व मेडल देण्यात येणार आहे. त्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

नोंदणी

२५ किमी फन राईडची नोंदणी फी ४०० रुपये तर ६० किमी एलिट रेसची नोंदणी फी १६०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. सर्व स्पर्धकांसाठी हेल्मेट बंधनकारक असून मार्गावर स्वयंसेवकांच्या मदतीने मुलांसह सर्व सायकलपटूंच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

राहण्याची व्यवस्था

जिल्ह्याबाहेरून व राज्याबाहेरून येणाऱ्या सायकलपटूंसाठी कुडाळ शहरात राहण्याची व आवश्यक त्या सोयींची व्यवस्था आयोजकांकडून केली जाणार आहे.

नोंदणीसाठी संपर्क

इच्छुक सायकलपटूंनी कुडाळ येथे शिव एंटरप्रायजेस (9921959988), इन्स्पायर सायकल (9421261212), परब हॉस्पिटल सुकळवाड (8208245018) येथे नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.