जिल्हास्तरीय टेनीकॉइट स्पर्धेत असरोंडी हायस्कूलचे उल्लेखनीय यश.
मालवण.
क्रीडा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेनाकाॅइट स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या चार संघांनी यशस्वी कामगिरी करत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. 17 वर्ष मुली, 19 वर्षे मुली व 19 वर्षे मुले या गटात तिन्ही संघांनी या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर 17 वर्षे मुले या गटात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या संघांना मार्गदर्शक क्रीडा शिक्षक कमलेश गोसावी यांनी केलं. मुख्याध्यापक सुशांत पाटील, संस्था अध्यक्ष विजय सावंत, सचिव प्रकाश सावंत व संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.