जिल्हास्तरीय युवा महोत्सव २९ ऑक्टोबरला सिंधुदुर्गनगरीत

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २९ ऑक्टोबरला सिंधुदुर्गनगरीत

 

सिंधुदुर्गनगरी

 

         राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा नियोजन समिती हॉल, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात येणार आहे.
    या महोत्सवासाठी 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. नोंदणीसाठी गुगल लिंक:  https://forms.gle/Sd6a8EtLMd8asYzJ8
  या वर्षीचा युवा महोत्सव “Cultural and Innovation Track” या संकल्पनेवर आधारित असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

         स्पर्धांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य (10 जण), लोकगीत (10 जण), चित्रकला, कवितालेखन, कथालेखन, वक्तृत्व, संकल्पना आधारित स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन व स्थानिक शेतीमधील शोध प्रकल्प अशा विभागांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 15 ते 19 वयोगटातील युवक-युवतींना या महोत्सवात सहभागी होता येणार असून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आयटीआय, महिला मंडळे यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन समितीने केले आहे.