कणकवलीत ९ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी

कणकवली
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीवर्ष आणि संत तुकाराम महाराज यांच्या 350 व्या वैकुंठ गमनानिमित्त, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने कणकवलीत रविवार, 9 नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली आहे.
एसटी वर्कशॉप येथील गणेश मंदिरातून सुरू होणारी ही दिंडी भालचंद्र महाराज मठापर्यंत जाईल. या दिंडीत 350 मृदुंग वादक, तसेच टाळकरी, विणेकरी, तुळस व कलशसह हजारो वारकरी सहभागी होतील.
दिंडीमध्ये सहभागी होणार्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार असून, दुपारी पंक्ती भोजनाचीही सोय करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने सर्व वारकऱ्यांनाही या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.