गणित प्राविण्य परीक्षेत रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाचे यश

गणित प्राविण्य परीक्षेत रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाचे यश


वेंगुर्ला 


     महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळातर्फे जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य व गणित पारंगत परीक्षेत मातोश्री पार्वती विद्यालय रेडी च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. पूर्वी सागर धुरी हिने गणित प्राविण्य परीक्षेत तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. तसेच आठवीची विद्यार्थिनी कु.गौतमी सिद्धार्थ दुबळे हिने तालुकास्तरावर द्वितीय व जिल्हा स्तरावर सहावा क्रमांक पटकावला.गणित पारंगत परीक्षेत कु. शमिता प्रशांत तळवणेकर हिने तालुकास्तरावर पहिला व कु. स्निथ आशिष परेरा याने तालुकास्तरावर दुसरा क्रमांक पटकावला.सदर विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीम. स्मिता आपटे, श्रीम.करिष्मा राणे, श्रीम.भाविका राणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था चिटणीस डॉ. विनय राऊत, शाळेचे मुख्य सल्लागार मधुकर मेस्त्री, शाळा समिती सदस्य श्रीकृष्ण पडवळ, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता विल्सन, शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.