कसाल येथे बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी २६ लाखाचा मुद्देमाल जप्त.

कसाल येथे बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी २६ लाखाचा मुद्देमाल जप्त.


कसाल
    बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १८ लाखाच्या दारूसह ८ लाखाची गाडी असा एकूण २६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमजद शेरखान पठाण (वय २३, रा. येरमाळा ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे राज्य उत्पादक शुल्कच्या भरारी पथकाकडून करण्यात आली.
     राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे वाहनाची तपासणी करत असताना मालवाहू टेम्पोमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. या प्रकरणी अमजद शेरखान पठाण याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून २६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे, निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जगन चव्हाण आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे करीत आहेत.