परुळे ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांचा मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

परुळे ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांचा मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

 

वेंगुर्ला

 

     दि. 27 मे  2025 रोजी राज्यपाल तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते परुळेबाजार ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी शरद श्रीरंग शिंदे यांचा जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल शासन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणुन सन्मान करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम मुंबई येथे संपन्न होणार असून शासनाच्या मार्फत दिला जाणारा हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांची शासनस्तरावर आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शासनाकडून नेमणूक जाहीर करण्यात आली असून यात शरद शिंदे यांचा समावेश आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे रहिवाशी आहेत. त्यांनी सन 2010 पासुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  सागरतीर्थ ग्रामपंचायत पासुन  ग्रामसेवक म्हणून सुरवात केली असून आतापर्यंत सागरतीर्थ, भोगवे, चीपी, कुषेवाडा, मेढा येथे काम केले आहे. सध्या ते परुळे बाजार येथे कार्यरत असून याठिकाणी त्यांनी सर्वांच्या सहकार्यातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे. सांडपाणी प्रक्रिया युनिट, तालुकास्तरीय प्लॅस्टिक घनकचरा युनिट, पंचायत लर्निग सेंटर, महिला बचत गटासाठी विविध रोजगार निर्मिती, मेढा/भोगवे येथे आंतरराष्ट्रीय ब्लुॅ फ्लॅग प्रकल्प यासारखे विविध प्रकारचे उपक्रम त्यांनी उत्तमरीत्या राबविले. परुळेबाजार ग्रामपंचायत येथे काम करताना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्य स्तरावर सलग दोन वर्ष ग्रामपंचायतीचे विशेष उल्लेखनीय कामदेखील त्यांनी केले आहे. शरद शिंदे यांच्या एकुणच या उत्कृष्ट सेवा कामाबद्दल 27 मे ला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शासनाच्यावतीने राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारबद्दल गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ परुळेबाजार/मेढा व आढळगावचे सरपंच व ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले आहे.