साटेली येथील देवी माऊली जत्रोत्सव २ डिसेंबरला

साटेली येथील देवी माऊली जत्रोत्सव २ डिसेंबरला

 

दोडामार्ग

 

        साटेली तर्फ सातार्डा येथील स्वयंभू देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी देवीची पूजा, अभिषेक, विविध धार्मिक कार्यक्रम, सुहासिनिंनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री 11 वाजता सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार असून त्यानंतर कलिंगण दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग असणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवी माऊली देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.