परुळेत नारळाच्या झाडावर कोसळली वीज. विजेच्या प्रभावामुळे घरातील वीज उपकरणे जळून मोठे नुकसान.

परुळेत नारळाच्या झाडावर कोसळली वीज.   विजेच्या प्रभावामुळे घरातील वीज उपकरणे जळून मोठे नुकसान.

वेंगुर्ला.

 

   तालुक्यातील परुळे गौतम नगर येथील श्री कानू लुमाजी परुळेकर यांच्या घराजवळ नारळाच्या झाडावर वीज कोसळून प्रचंड नुकसान झाले.याच दरम्यान परुळेकर यांच्या घरात विजेचे लोळ जाऊन इलेक्ट्रिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर आगीमुळे माडाचे झाड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. विजेच्या प्रभावामुळे घरातील वीज उपकरणे जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आज बुधवारी आज सायंकाळी ६ वाजता सायंकाळी प्रचंड प्रमाणात विजा च्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला त्यावेळी विजांचा कडकडाट होऊन वीज परुळेकर यांच्या घरा लागत झाडावर पडून झाड उशिरा पर्यंत आगीत धुमसत होते. नुकसानीचे वृत्त समजताच सरपंच प्रणिती आंबडपालकर,  उपसरपंच संजय दूधवडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसानीची पाहणी केली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. पण या घटनेने परुळेकर कुटुंबीय प्रचंड घाबरले होते.