भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांचे मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांचे मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

 

वेंगुर्ला

 

        भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने आणि भाजपा युवा नेते विशाल परब पुरस्कृत मोफत महिलांसाठी प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे झाला. तीन दिवस चाललेल्या या शिबिरात शहर व तालुक्यातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला. उमा फॅशन इन्स्टिट्यूट, चिपळूणच्या संचालिका व प्रशिक्षक सौ. उमा म्हाडदळकर यांनी मोत्यांचे दागिने, फॅब्रिक ज्वेलरी, महिरप, मॅट रंगोळी आणि कचऱ्यापासून फॅन्सी वस्तू तयार करण्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले.
       समारोप कार्यक्रमात महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन मांडले. उपस्थित पाहुण्यांनी त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
आयोजकांच्या मते —
“या शिबिराला मिळालेला प्रतिसाद म्हणजे महिलांच्या स्वावलंबनाची जागृती. प्रत्येक सहभागी महिला आता आत्मविश्वासाने पुढे जाण्यास तयार आहे.”
       या कार्यक्रमाला ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, सौ. वृंदा गवंडळकर, सौ. श्रेया मयेकर, डॉ. पुजा कर्पे, सौ. चेतना राजपूत, सौ. वैभवी मालवणकर, सौ. कृपा मोंडकर, सौ. आकांक्षा परब, सौ. रसिका मठकर आदी मान्यवर उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.उपस्थित महिलांनी भविष्यात स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.