रत्नागिरी मत्स्य व्यवसाय विभागाचे कारवाई सत्र सुरूच, नौकेवरील ८- ९ लाखांचे एलईडी साहित्य जप्त

रत्नागिरी
रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत मासेमारी करणारी दुसरी नौका पकडली आहे.जयगड समुद्रात एलईडी मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकेवर कारवाई केल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाने महालक्ष्मी नौका IND - MH-4-MM-2813 ही नौका ताब्यात घेतली. सदर नौकेची झडती घेतली असता नौकेवर LED बल्ब व जनरेटर आढळून आले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत एल.ई. डी. नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. सदर नौका जप्त करून मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली. त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून कार्यालयात ठेवण्यात आली असून अंदाजे 8-9 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. सदर नौकेवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले व सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे.