अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कणकवली येथे आज शोकसभा

अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कणकवली येथे आज शोकसभा

 

कणकवली

 

       राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सायंकाळी ६ वाजता कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कणकवली शहरासह जिल्ह्यातील अजित पवार प्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.