पळसंब येथे व्यायामशाळा इमारतीचे आ.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन. शिवसेना शाखाप्रमुख पदी वैभव सावंत तर युवासेना शाखाप्रमुख पदी कपिल मुणगेकर यांची निवड.

मालवण.

   महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून पळसंब गावठण येथील जयंतीमंदिर परिसर येथे  व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत. या व्यायाम शाळेच्या इमारतीसाठी  ७ लाख रुपये मंजूर झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत  देवस्थान मानकरी  श्रीप्रकाश ( अण्णा) कापडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भुमीपुजन करण्यात आले.
   यावेळी वैभव वसंत सावंत यांची पळसंब गावच्या शिवसेना शाखाप्रमुख पदी तर कपिल कृष्णा मुणगेकर यांची युवासेना शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
   यावेळी शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे उपविभाग प्रमुख अनिल गांवकर, देवस्थान मानकरी अनिल पुजारे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा गावकर, देवस्थान अध्यक्ष रमेश परब, उपाध्यक्ष मधुकर कदम ,राजन पुजारे, बबन पुजारे तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश पुजारे, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, ग्रामपंचायत सदस्य अक्षय परब, छोटु पांगे, सुरेश गावकर, चेअरमन श्रीकांत बागवे, अरविंद साटम, संदिप तेली, त्रिंबक ग्रामपंचायत सदस्य सागर चव्हाण, अक्षय पुजारे, स्मिता परब जुवेकर, रुतुजा सावंत, शाखा प्रमुख पिंट्या सावंत, कपील मुणगेकर, मेघशाम जुवेकर, अनिल परब, अमित पुजारे, देऊ सावंत, रतिका गोलतकर, पुनम गोलतकर, वंदना चिंचवलकर, मगेश सावंत यांसह गावातील  शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.