विशाल परब यांनी रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद : पालकमंत्री रवींद्र चव्हाण. सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.

विशाल परब यांनी रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद : पालकमंत्री रवींद्र चव्हाण.  सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.

सावंतवाडी

       विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले.भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेषतः सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज मंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
   यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, गोवा मांद्रे आमदार जीत आरोलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरेगावकर, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विशाल परब,सौ. वेदिका परब माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, दिलीप भालेकर, राजू बेग मनोज नाईक, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.