परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील घरकुल योजनांची ग्रामीण विकास यंत्रणेकडून पाहणी.
वेंगुर्ला.
परूळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनातील घरकुलचे सहायक संचालक NIC ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार अजय मोर, राज्य समन्वयक राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माण राम आघाव यांनी पहाणी केली.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे मनोज बेहरे उपस्थित होते.त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थीच्या घरकुलांची पाहणी केली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू, ग्रामसेवक शरद शिंदे आदी उपस्थित होते.समितीने माहिती घेऊन लाभार्थी यांचे कौतुक केले.