मधुसूदन मेस्त्री यांचा उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मान

मधुसूदन मेस्त्री यांचा उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मान

 

वेंगुर्ला

 

     महसूल दिनानिमित्त आरवली, सागरतीर्थ येथील पोलीस पाटील म्हणून कार्यरत असणारे मधुसूदन गजानन सुतार मेस्त्री यांचा उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मान करण्यात आला. श्री. मेस्त्री हे वेंगुर्ला तालुका पोलीस संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत कार्यतत्पर, निष्ठावान व समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. श्री. मेस्त्री यांनी आपल्या कारकीर्दीत शिरोडा, आसोली, मोचेमाड, मठ अशा विविध ठिकाणी कार्यभार सांभाळून प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली.