देवगड तालुका भाजपा मंडलाची कार्यकारिणी जाहीर

देवगड
देवगड तालुका मंडळाचे अध्यक्ष सदाशिव उर्फ राजा भुजबळ यांनी देवगड तालुका मंडलची कार्यकारणी जाहीर केली असून कार्यकारणीच्या सरचिटणीसपदी माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांची निवड झाली आहे. तर उर्वरित कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून श्री. देवदत्त दामोदर कदम, श्री. गोविंद श्रीधर सावंत, श्री. उल्हास कमलाकर मणचेकर, श्री. निवृत्ती रविंद्र तारी यांची नियुक्ती झाली आहे. महिला उपाध्यक्ष म्हणून सौ. शुभांगी विठ्ठल राणे आणि सौ. मृणाली महेश भडसाळे यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीस पदासाठी श्री. योगेश प्रकाश चांदोस्कर आणि श्री. महेश विजय जंगले यांची निवड झाली आहे. चिटणीस म्हणून श्री. सदानंद (नंदू) प्रभाकर देसाई, श्री. महेश विठ्ठल ताम्हणकर कार्यरत आहेत. महिला चिटणीस म्हणून सौ. संध्या प्रकाश राणे, सौ. प्राजक्ता प्रदीप घाडी आणि सौ. साक्षी कृष्णकांत गुरव यांची नियुक्ती झाली आहे. कोषाध्यक्ष पदासाठी श्री. विजय भिकाजी वाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदस्यपदासाठी खालील व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.श्री.महेश सखाराम पाटोळे, श्री. संतोष गंगाराम साळसकर, सौ. उषःकला उदयराज केळुसकर, श्री. अमित रमेश साटम, श्री. शैलेश बाळकृष्ण बोंडाळे, श्री. सरफराज जयनुदीन शेखजमादार, श्री. विश्वमित्र चंद्रकांत खड़पकर, सौ. स्वरा सुशिल कावले, सौ. रुचाली दिनेश पाटकर, सौ. मनिषा अनिल जामसंडेकर, सौ. तन्वी योगेश चांदोस्कर, सौ. प्रणाली मिलिंद माने, सौ. मीताली सावंत, सौ. अरुणा योगेश पाटकर, सौ. आया अमेश गुमास्ते, सौ. अपूर्वा दिगंबर तावडे, सौ. श्वेता संदेश शिवलकर, सौ. प्राजक्ता पांडुरंग घाडी, सौ. निकिता निलेश कदम, सौ. मनस्वी महेश घारे, सौ. सावी गंगाराम लोके, सौ. तन्वी जितेंद्र शिंदे, श्री. ज्ञानेश्वर सूर्यकांत खवळे, श्री. ओंकार रावजी खाजणवाडकर, श्री. शैलेश सुनील लोके, श्री. सुभाष सखाराम नार्वेकर, श्री. बापू शांताराम जुवाटकर, श्री. निखिल लवू कोयघाडी, श्री. चंद्रकांत मधुकर कावले, श्री. संजय शांताराम बांबुळकर, श्री. अजित बापू कांबळे, श्री. सुभाष पुंडलिक धुरी, श्री. महेश मधुकर मेस्त्री, श्री. वसंत साटम, श्री. अमोल दत्ताराम ठुकरूल, श्री. श्रीकृष्ण अनुभवणे, श्री. रविंद्र वासुदेव ठुकरूल, सौ. सायली प्रदीप पारकर, श्री. रोहित बाबाजी कोठारकर, श्री. अनिल लाड, श्री. रत्नदिप कुवळेकर, श्री. पंकज जगन्नाथ दुखंडे, श्री. प्रकाश विष्णु सावंत, श्री. चंद्रकांत (गोविंद) विश्राम घाडी आणि श्री. शैलेंद्र नाना जाधव. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी संदीप साटम, बाळ खडपे, यांच्यासह प्रियांका साळसकर, उल्हास मंचेकर, दयानंद पाटील, बाळा गावकर, राजेंद्र वालकर, माधव कुलकर्णी यासह अनेक जण उपस्थित होते.