नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी २४ जूनपर्यंत प्रस्ताव सादर करा.

नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी २४ जूनपर्यंत प्रस्ताव सादर करा.

सिंधुदुर्ग.

   सेवा सोसायट्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत. अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे आपले प्रस्ताव दि.24 जून 2024 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत कार्यालयात स्वहस्ते सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी केले आहे.
  बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यांच्या उद्देशाने रु. 3 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक इएसई-२००३/प्र.क्र.१९१/रोस्वरो-१, दि. 01 फेब्रुवारी 2006 जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्र प्राप्त झाली आहेत.
  आवश्यक अटी व शर्तीच पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.