ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन.
सिंधुदुर्ग.
जिल्हा व तालुका ठिकाणातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती -(क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण चे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे.
"ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने" करीता पुढीलप्रमाणे वेळापत्रकानुसार या कार्यालयाकडून अर्ज वाटप व स्विकृती ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षासाठी दि.20 जून 2024 ते दि. 15 जुलै 2024 पर्यत अर्ज करता येणार आहे. तर उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षासाठी दि. 5 ऑगस्ट 2024 पासून ते 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज वाटप व स्विकृती सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग येथे सादर करावेत.