सिंधुदुर्गातील काजू, आंबा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरच मिळणार - आ. निलेश राणे

मुंबई
सिंधुदुर्गातील काजू व आंबा शेतकऱ्यांचे २०२२-२३ मध्ये नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांच्या थकीत रकमेचे त्वरीत वितरण व्हावे यासाठी निवेदन सादर करण्यात आले. त्यानुसार संबधित शेतकऱ्यांची थकीत रक्कम लवकरच वितरित केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.जिल्ह्यातील काजू, आंबा शेतकऱ्यांचे सन २०२२-२३ मध्ये नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र आजतागायत फळपीक विमा योजनेतील नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नव्हती. याप्रकरणी मुंबईत मंत्रालयात कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या दालनात सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कोकण विभागीय सहसंचालक बालाजी ताटे व इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांच्या थकीत रकमेच्या त्वरित वितरणासाठी निवेदन सादर करण्यात आले. त्यानुसार लवकरच रक्कम वितरित केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.