झाराप येथे वेंगुर्ला तालुक्यातील शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

झाराप येथे वेंगुर्ला तालुक्यातील शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

झाराप 


       महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा विभाग, उमेद विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी झाराप येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.  आयोजित या शिबिरात तालुक्यातील सुमारे ५२ शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.या प्रशिक्षणात कृषी विभागाचे नोडल अधिकारी श्री. संदीप देसाई (उप कृषी अधिकारी) तसेच आत्मा विभागाचे वेंगुर्ला तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. धनंजय गोळम यांनी सहभाग घेत मार्गदर्शन केले.शिबिरामध्ये गटशेतीच्या माध्यमातून शेतीतील खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादनात वाढ कशी साधता येईल याबाबत सखोल माहिती देण्यात आली. आधुनिक शेती पद्धती, नियोजनबद्ध व्यवस्थापन, सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था आणि शेतीतील विविध अडचणींवर मात करण्यासाठी गटशेतीचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला.नैसर्गिक आपत्ती व आर्थिक संकटांचा सामना करताना गटशेती हा प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरू शकतो, असे मत उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केले.यावेळी मा. अनिकेत कदम (उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी), मा. प्रकाश मोहिते (तालुका कृषी अधिकारी, वेंगुर्ला) तसेच भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे श्री. प्रसाद देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून भविष्यात गटशेतीचा अवलंब करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.