मळेवाड श्री देव काळोबा मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रम

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-जकातनाका येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव काळोबा मंदिरात २२ एप्रिलला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक विधी, दुपारी ब्राह्मण भोजन, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजन तसेच रात्रौ ठीक ८:३० वाजता मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोरे (कुडाळ) यांचा "वैरी झाला धनी कुंकूवाचा" हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन, मुरकरवाडी ग्रामस्थ व काळोबा कला क्रीडा मंडळ यांनी केले आहे.