शस्त्र परवाना नुतणीकरणाचे आवाहन.

शस्त्र परवाना नुतणीकरणाचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

  जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकांना शस्त्र परवान्यांची  मुदत दि. 31 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्यांची नुतणीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या उपचिटणीस  शाखेत दुपारी 1 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी  केले आहे.
   शस्त्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेल Form A-3 परिपूर्ण माहितीसह सादर  करावा.(अर्जावर फोटो आवश्यक आहे.) शस्त्र वापरणेस शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्यात S-3 नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे प्रमाणपत्र. शस्त्र परवाना नुतणीकरण करीता आवश्यक असलेला Form- S-4 संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्याकडून सही शिक्कानिशी सादर करावा.  शस्त्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलिस ठाणे निरीक्षक यांच्याकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र. सरपंच/पोलिस पाटील नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तवणुकीचा दाखला, किंवा आधारकार्ड. मुळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा. परवाना नुतणीकरण पाच वर्षोकरीला फी रु.2500/- (रुपये दोन हजार पाचशे मात्र) शासन जमा करणे आवश्यक आहे. सदर परवान्यास नुतणीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी प्रमाणे 500/- दंड आकारण्यात येईल. तसेच शस्त्र परवांना नुतणीकरण करणेस विलंब झाल्यास सबळ पुरावा सादर करावा. शस्त्र परवाना नुतणीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 तहसिलदार कार्यालय येथील सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्ज पोस्टाद्वारे किंवा तालुक्याचे ठिकाणी स्विकारले जाणार नाहीत. तसेच नुतणीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत.
  एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून तालुकानिहाय कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. नेमलेल्या तारखांनाच त्या त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे. देवगड दि. 1,4,5, डिसेंबर 2023, सावंतवाडी दि. 6,7,8 डिसेंबर 2023, दोडामार्ग दि. 11,12 डिसेंबर 2023, मालवण दि. 13,14,15, डिसेंबर 2023, वैभववाडी दि. 18,19 डिसेंबर 2023, कणकवली दि. 20,21,22 डिसेंबर 2023, कुडाळ दि. 26,27 डिसेंबर 2023, वेंगुर्ला दि. 28,29 डिसेंबर 2023.