शरद पवार यांचे वेंगुर्ल्यात आगमन

वेंगुर्ला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून वेंगुर्ला येथे त्यांचे आगमन झाले आहे. वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्राला भेट देऊन केंद्राच्या संशोधन केंद्राची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर बॅ. नाथ पै स्मृती व समुदाय केंद्र येथे भेट देणार व तेथील उपक्रमांची माहिती घेणार आहे. यावेळी पवार यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केले.