शिरोडा येथे दिपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन.
शिरोडा
मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या शिरोडा येथिल शिक्षा मुंडगा रस्ता 153 की.मी सुधारणा करणे तसेच शिरोडा हरिजनवाडी ते शेटे डोंगरी ते बिरोबा मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे कामांची भूमिपूजने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डूबळे, सुनील मोरजकर, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, विभाग प्रमुख अमित गावडे , उपतालुकाप्रमुख कौशिक परब, कोस्टल तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, शाखाप्रमुख संदीप मसुरकर, माजी सदस्य दिलीप मठकर, जगन बांदेकर, मयुरेश शिरोडकर, अर्चना नाईक, शेखर मोंडकर, सुधीर नार्वेकर बाळा मयेकर व अनिल नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.